पुणे: भरधाव बसच्या धडकेने पादचारी मृत्युमुखी पडल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. अपघातानंतर पसार झालेल्या बस चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यंकट श्रीरंग आघाव (वय ४९, रा. परळी वैजनाथ, जि. बीड) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत मारुती आघाव (वय २७) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारुतीचे वडील व्यंकट नगर रस्त्यावरुन निघाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

लाेणीकंद परिसरात विठाई पेट्रोल पंपासमोर भरधाव बसने व्यंकट यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यंकट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर बसचालक पसार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सी. ए. माने तपास करत आहेत.