पीएमपी बसच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर परिसरात घडली. या प्रकरणी पीएमपी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.रवींद्र बबन अडसूळ (वय ५५, रा. कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत अडसूळ यांचा मुलगा लक्ष्मण याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>>पुणे विद्यापीठावर भाजपचेच वर्चस्व; महाविकास आघाडीला एकच जागा
रवींद्र अडसूळ कुंजीरवाडी फाटा परिसरातून निघाले होते. त्या वेळी पीएमपी बसने अडसूळ यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अडसूळ यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.