पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड येथे मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्याच दरम्यान पायी जाणाऱ्या एका नागरिकाला वळूने जोरात धडक देऊन शिंगाने उचलून आपटल्याची घटना घडली.तर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दौंड येथील सरपंच वस्तीच्या दिशेने एक व्यक्ती पायी घरी जात होता.मात्र त्या व्यक्तीला मोकाट फिरणाऱ्या वळूने जोरात धडक दिली.त्यानंतर तेथून बाजूला होण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करीत होती.तेवढ्यात वळूने शिंगाने त्या व्यक्तीला उचलून आपटले. त्यानंतर आजूबाजूला असणार्‍या नागरिकांनी त्या व्यक्तीला बाजूला घेऊन गेले.तर या घटनेमध्ये तो नागरिक किरकोळ जखमी झाला आहे.

तसेच या घटनेची माहीती दौंड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवताच अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर पुढील काही मिनिटात राजेंद्र सोनवणे,अशोक जगताप,आरिफ फकीर,निरज चंडालिया यांच्या टीमने वळूला ताब्यात घेतले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर दौंड नगरपालिका मुख्य अधिकारी विजय कावळे दौंड म्हणाले,दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय कावळे म्हणाले, मोकाट फिरणाऱ्या वळूने एका नागरिकाला धडक दिल्याची माहिती आमच्याकडे मिळताच, आमची टीम घटनास्थळी दाखल होऊन वळू ला ताब्यात घेतले आहे.तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये,मोकाट जनावरांसाठी आम्ही टीम तयार केल्या आहेत.येत्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही,याबाबत काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.