लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अंदमान -निकोबार येथे सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याच्या आमिषाने १५ पर्यटकांची फसवणूक केल्या प्रकरणी एका पर्यटन कंपनीच्या संचालकांच्या विरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
case registered against who sold clay pots by blocking road in kalyan
कल्याणमध्ये रस्ता अडवून मातीच्या कुंडी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी

याबाबत हर्षल संभाजी शिंदे (वय ३२, रा. वास्तूनगर, सोसायटी, मार्केटयार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पर्यटन कंपनीचे संचालक सत्यकी मैती याच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे, त्यांचे मित्र यांच्यासह १५ जणांना अंदमान-निकोबार येथे जायचे होते.

आणखी वाचा- पुणे: खासगी प्रवासी बसमधील महिलांचा ऐवज चोरणारे गजाआड

पर्यटन कंपनीचे संचालक मैतीने सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून शिंदे यांच्यासह १५ जणांकडून आगाऊ स्वरुपात एक लाख ६० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर पर्यटन कंपनीकडून सहल काढण्यात आली नाही. शिंदे यांच्यासह १५ पर्यटकांनी मैतीकडे विचारणा केली. त्यांचे पैसेही परत करण्यात आले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे तपास करत आहेत.