पुणे : रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत एप्रिल महिन्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना सरव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गौरवण्यात आले. यात मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर विभागातील प्रत्येकी एक आणि सोलापूर विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नुकताच हा कार्यक्रम झाला. पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये पुणे विभागातील दौंडचे स्थानक व्यवस्थापक अमित शर्मा, मुंबई विभागातील मास्टर क्राफ्ट्समॅन चिंतामणी वाघ, नागपूर विभागातील गेटमन पप्पू कुमार, सोलापूर विभागातील पॉइंट्समन राजाराम घोडके आणि तंत्रज्ञ सरस्वती मलप्पा यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी एम. एस. उप्पल, प्रधान मुख्य अभियंता राजेश अरोरा, प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक मुकुल जैन, प्रधान मुख्य विद्युत अभियंता एन. पी. सिंग आणि विभागांच्या प्रधान प्रमुखांसह मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.