पुणे  : राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील तिसरी, चौथी, सहावी, सातवी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४मधील संकलित मूल्यमापन परीक्षा (पॅट) घेण्यात येणार आहे. २ ते ४ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेत प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा या विषयांचा समावेश असणार आहे. तर पाचवी आणि आठवीची स्वतंत्रपणे वार्षिक परीक्षा होणार असल्याने या इयत्तांना ही चाचणी लागू नाही.

हेही वाचा >>> आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा, विराज खटावकर यांनी साकारला सात फूट उंचीचा पुतळा

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आतापर्यंत संकलित मूल्यमापन चाचणी १ घेण्यात आली आहे. तर तिसरी, चौथी, सहावी, सातवी या इयत्तांच्या प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा या विषयांचा संकलित मूल्यमापन २ परीक्षेमध्ये समावेश असल्याने उर्वरित विषयांच्या प्रश्नपत्रिका शाळांनी त्याच्या स्तरावर तयार करून मूल्यमापन करायचे आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यंदापासून  पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या इयत्तांसाठी संकलित मूल्यमापन २ ही परीक्षा लागू असणार नाही. पाचवी, आठवीची वार्षिक परीक्षा द्विती सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यात प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करायच्या आहेत. त्यासाठी एससीईआरटीने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या नमूना प्रश्नपत्रिका, संविधान तक्ते यांचा आधार घेता येईल. या परीक्षेत किंवा विषयात उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर महिनाभरात पुनर्परीक्षा घ्यायची आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader