लोणावळा : लोणावळा शहरात होणारी कोंडी विचारात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन जाणारी जड वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. लोणावळा शहरात दिवसा जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोणावळा, खंडाळा परिसरात वर्षाविहारासाठी मुंबई-पुण्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शनिवार आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी असते. लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर ट्रक, कंटेनर करतात. जड वाहतुकीमुळे वाहतुकीचा वेग संथ होऊन लोणावळा शहरात ठिकठिकाणी कोंडी होते. लोणावळा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सकाळी सहा ते रात्री दहा यावेळीत सर्व प्रकारच्या जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

हेही वाचा…पुणेकरांना गुड न्यूज! स्वारगेटहून आता थेट मंत्रालयासाठी शिवनेरी सुरू

जड वाहनांमुळे लोणावळा शहरात गंभीर अपघात झाले आहेत. लोणावळ्यातील मनशक्ती केंद्र आणि खंडाळ्यातील बॅटरी हिल दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, मुंबई-पुणे महामार्गावरून जाणारी जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. लोणावळा शहरातून जाणाऱ्या जड वाहनांनी द्रुतगती मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permanent ban on heavy vehicles during daytime in lonavala traffic of heavy vehicles on mumbai pune highway by alternative route pune print news rbk 25 psg