पुण्यात होणाऱ्या आगामी उत्सव सणाच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी आणि करमणुकीच्या जागांमध्ये विनापरवाना ध्वनिक्षेपक लावल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी पोलिसांकडून परवानगी घेऊनच ध्वनिक्षेपक लावावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आगामी गणेशोत्सव, नवरात्र, उत्सव सणाच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे कंत्राटदारांचा ध्वनिक्षेपक परवाना हा विभागीय पोलीस आयुक्तांकडे मिळेल. तर, आयोजकांचा ध्वनिक्षेपक परवाना हा स्थानिक पोलिसांकडून मिळेल. या अर्जाचे नमुने याच कार्यालयात मिळतील. हा परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. विना परवाना ध्वनिक्षेपक लावल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३१ नुसार कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
आणखी वाचा