पुणे : गोखलेनगर भागात तरुणींची छेड काढणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. आदित्य उर्फ बकासूर अविनाश मोरजकर (वय १९, रा. होमी भाभा हाॅस्पिटलजवळ, वडारवाडी, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोरजकरविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला होता. मोरजकरने जनवाडी, गोखलेनगर परिसरात तरुणींची छेड काढण्याचे गुन्हे केले होते. मोरजकर पसार झाला होता. तो जनवाडीतील जनसेवा चौकात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी धनंजय ताजणे, मॅगी जाधव, प्रदीप राठोड यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला.

हेही वाचा – पिंपरी : शॉर्टकट भलताच महागात पडला, दलदलीत फसलेल्या व्यक्तीची अग्निशमन विभागाने केली सुटका

हेही वाचा – पुण्यातील गतिरोधक जीवघेणे

सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दराेडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, उपनिरीक्षक शाहीद शेख, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, प्रदीप राठोड, गणेश ढगे, आजीनाथ येडे आदींनी ही कारवाई केली.