पुणे : कर्वेनगर भागातील एका महाविद्यालयाच्या परिसरात पानपट्टीत गांजा, तसेच भांगेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या पानपट्टीचालकास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. रामबाबू देवनारायण महातो (वय ३१, सध्या रा. कॅनोल रस्ता, कर्वेनगर, मूळ रा. रोहुवा, जि. सातावाडी, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

महातो याची कर्वेनगरमधील कॅनोल रस्ता परिसरात पानपट्टी आहे. या भागात महाविद्यालय असून, कॅनोल रस्ता परिसरात मोठ्या संख्येने परगावातील विद्यार्थी राहायला आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी पांडुरंग पवार, सचिन माळवे गस्त घालत होते. त्या वेळी महातो पानपट्टीत गांजा, तसेच भांगेच्या गोळ्यांची (बंटा) विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

Drug dealer, Katraj, Drug , Charas,
कात्रज भागात अमली पदार्थ विक्री करणारा गजाआड, एक लाखांचे चरस जप्त
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
rasta roko kudalwadi marathi news
पिंपरी : अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईला विरोध; कुदळवाडीतील व्यावसायिकांकडून रस्ता बंद
pune police action against vendors selling tobacco products near schools and colleges
शाळांजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या जमीनदोस्त, हडपसर भागात पोलिसांची कारवाई
Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
One person arrested with ganja stockpile in Kopar Dombivli
डोंबिवलीत कोपरमध्ये गांजाच्या साठ्यासह एक जण अटकेत

हेही वाचा – VIDEO: गोष्ट पुण्याची – २५० वर्षांपूर्वीची पेशवेकालीन भुयारी नळयोजना आजही आदर्श का? जाणून घ्या

पोलिसांच्या पथकाने महातोच्या पानपट्टीवर छापा टाकला. पानपट्टीतून ११० ग्रॅम गांजा, तीन किलो ५१५ ग्रॅम बंटा असा ४७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महातोविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्के, राहुल जोशी, सुजीत वाडेकर आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader