लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : गृहनिर्माण संस्थेमधील वाहने धुण्यासाठी आलेल्या तरुणाला पाळीव श्वान चावल्याने श्वानमालक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथील डॅफोडिल्स गृहरचना सोसायटीत १२ फेब्रुवारी रोजी घडली.
नितन सत्यादास (वय ३३, रा. पिंपळे सौदागर) याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्वानमालक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-धक्कादायक! पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जाळून टाकण्याचा प्रयत्न
पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यादास हा वाहने धुण्याचे काम करतो. तो गृहनिर्माण संस्थेमधील वाहने धुण्यासाठी गेला होता. आरोपी महिला या सदनिकेसमोरील मोकळ्या जागेत श्वानाला घेऊन आली होती. त्यावेळी श्वानाने सत्यादास याच्या मांडीला चावा घेतला. त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.