प्रक्षोभक भाषणांतून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने ‘एमआयएम’ पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करून पुण्यातील दोघा युवकांनी पुणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गणेश भोकरे व वृषभ शिंगवी अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. ओवैसी यांच्या वादग्रस्त भाषणांच्या क्लिप इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यानुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आपला कोणत्याही संघटनेशी संबंध नाही, मात्र भारताचा एक सुजाण नागरिक या नात्याने आम्ही ही याचिका दाखल केल्याचे भोकरे यांनी सांगितले.

Story img Loader