यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातूनही आता नियमित पीएचडी करता येणार आहे. विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये पर्यावरणशास्त्र विषयाचा समावेश करण्याचा निर्णयही विद्यापीठाने घेतला आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातूनही आता नियमित पीएचडी करण्यात येणार आहे. यापूर्वी पीएचडीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने २००९ मध्ये पीएचडीसाठी ठरवून दिलेले निकष पूर्ण केल्याशिवाय पीएचडी प्रमाणपत्र न देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याचप्रमाणे यापुढे विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये पर्यावरणशास्त्र विषयाचाही समावेश करण्याला परिषदेने मान्यता दिली आहे.
पत्रकारिता आणि संज्ञापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.ए.) सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठातर्फे कम्युनिटी कॉलेज सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्याचप्रमाणे निरंतर शिक्षण विभाग व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत.