Pune Porsched Car Accident Update : पुणे पोर्श अपघात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केल्याचं तपासातून उघड झालं आहे. १९ मे रोजी पहाटे २.३० च्या सुमारास अगरवाल आणि टिंगरे यांच्यात एकूण ४५ मिस्डकॉल्स होते. पुणे टाईम्स मिररने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अपघात घडल्यानंतर विशाल अगरवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना फोन केला. आमदार टिंगरे झोपेत असल्याने त्यांनी सुरुवातीला फोन उचलला नाही. पहाटे ३.४५ पर्यंत विशाल अगरवाल यांनी टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केला. परंतु, ४६ व्या कॉलला त्यांनी उत्तर दिलं. त्यानंतर ते लागलीच सकाळी ६ वाजता ते येरवडा पोलीस ठाण्यात अगरवाल यांच्या मदतीसाठी पोहोचले. पोलीस ठाण्याच्या आवारातून जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही आमदार टिंगरे स्पष्टपणे दिसत आहेत.

Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”

हेही वाचा >> ‘ससून’मध्ये दिवसाला २४ रुग्णांचा मृत्यू कसा? नवीन अधिष्ठात्यांनी पदभार स्वीकारताच घेतला मोठा निर्णय

“अगरवाल कुटुंब, पोलिस अधिकारी आणि आमदार टिंगरे यांच्यातील संवादाची नोंद झाली आहे”, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीकवरून पुणे टाईम्स मिरलला दिली. परंतु, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक तपशील किंवा संभाषणाचे तपशील देण्यास नकार दिला. विशाल अगरवाल हे आमदार टिंगरे यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. तसंच, ही घटना त्यांच्याच मतदारसंघात घडली असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती, असं सुनील टिंगरे यांनीही स्पष्ट केलं होतं.

अपघाताच्या दुसऱ्या दिवसापासून टिंगरे यांचं नाव या अपघातात घेतलं जात होतं. परंतु, आपण अगरवाल कुटुंबाला वाचवण्याकरता नाही तर या अपघात प्रकरणी न्याय मिळण्याकरता प्रयत्न करत असल्याचा खुलासा टिंगरे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र, आता टिंगरे, अगरवाल कुटुंब आणि ससूनचे सामान्य रुग्णालयाचे डॉ.अजय तावरे यांच्यातील संबंध समोर आले आहेत.

टिंगरे यांच्याविरोधात मतदारसंघात रोष

आमदार सुनील टिंगरे यांच्याविरोधातील रोष आता वाढू लागला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. टिंगरे यांच्या उपस्थितीत मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला. तसंच, मृत अनीश अवधियाचे काका ग्यांद्र सोनी यांनी रुग्णवाहिका व्यवस्था आणि इतर कायदेशीर औपचारिकता दरम्यान मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, ससूनचे डॉ.अजय तावरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जातेय.

हेही वाचा >> ससूनमधील रक्ताच्या नमुन्यांचे गौडबंगाल अखेर उघड! चौकशी समितीच्या अहवालात मोठा खुलासा

तिघांच्या भूमिका निश्चित करण्यासाठी तपास

दरम्यान, पोलिसांच्या तपासात पोलीस ठाणे आणि ससून जनरल हॉस्पिटलमध्ये दोन आलिशान गाड्या असून त्यांच्याशी संबंधित तीन व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. १९ मे रोजी अल्पवयीन मुलाला पकडले तेव्हा हे लोक पोलीस ठाण्यात हजर होते आणि रक्ताचे नमुने घेईपर्यंत ते थांबले होते. त्यांची ओळख आणि घटनेतील भूमिका निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे.

Story img Loader