ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे यांनी काढलेल्या महाराष्ट्राबाहेरील किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या ११ ऑक्टोबरपासून बालगंघर्व कलादालनात भरविण्यात येत आहे.
मांडे यांनी महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेरील १६ राज्यातील किल्ल्यांना भेट देत त्यांची छायाचित्रे काढली आहेत. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील हरिपर्वत या किल्ल्यापासून ते कन्याकुमारीजवळील वट्टकोटाई किल्ल्यापर्यंत असे अनेक अपरिचित दुर्गाचे दर्शन होणार आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, दिल्ली, गोवा, दीव-दमण, आंध्रप्रदेश, छत्तीसगड आधी राज्यातील दुर्गसंपदा पाहण्यास मिळणार आहे.
११ ते १६ ऑक्टोबपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ११ रोजी सकाळी १० वाजता संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाच्या कालावधीत रोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत अभ्यासकांची व्याख्यानेही आयोजित केली आहेत.
महाराष्ट्राबाहेरील किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
११ ते १६ ऑक्टोबपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ११ रोजी सकाळी १० वाजता संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांच्या हस्ते होणार आहे. या कालावधीत रोज सायं. ६ ते ७ या वेळेत अभ्यासकांची व्याख्यानेही आयोजित केली आहेत.

First published on: 08-10-2013 at 02:43 IST
TOPICSफोटो प्रदर्शन
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo exhibition of forts by pramod mande