पुणे : नायलॉन मांजाच्या गुंत्यामध्ये अडकलेल्या कबुतराला कसबा पेठ येथील सजग नागरिकाने जीवदान दिले. हे कबुतर उडू लागले तेव्हा त्याची सुटका करणाऱ्या व्यक्तीला समाधान लाभले.
पक्ष्यांसह माणसासाठी जीवघेणा ठरत असलेल्या नायलॉन मांजावर शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. तरीही या मांजाची सर्रास विक्री होताना दिसत आहे. नायलाॅन मांजामुळे पक्ष्यांचा जीवही गेला आहे. पुण्यातील कसबा पेठेत तांबट हौद येथे सजग नागरिकाने मांजाच्या गुंत्यात अडकलेल्या पक्ष्याला जीवनदान दिले आहे.
हेही वाचा – पुणे : वीरयोद्ध्याकडून नागरिकांनी अनुभवला कारगिल युद्धाचा थरार
तांबट हौद परिसरात राहणारे शिरीष महाजन यांना त्यांच्या घराच्या छतावर पूर्णपणे पतंगाच्या मांजात अडकलेले कबुतर दिसले. मांजाचा गुंता शरीराभोवती असल्याने कबुतराला हालचाल करता येत नव्हती. अशा वेळी काय करावे असा प्रश्न महाजन यांना पडला. मात्र, तडफडणाऱ्या पक्ष्यासाठी त्यांना काहीतरी करायचे या उद्देशातून त्यांनी वेळ न दवडता मांजामधे अडकलेल्या पक्ष्याची काठीचा वापर करत सुटका केली. पक्ष्याच्या शरीराभोवती अडकलेला मांजा काढून त्याला जीवदान दिले.