नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास करताना मांत्रिकाच्या साह्याने प्लॅंचेट केल्याच्या आरोपावरून पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर दाभोलकर हत्येचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करीत असल्यामुळे याचिकाकर्त्यांनी त्यांच्याकडे आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.
न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. पी. डी. कोडे यांच्या खंडपीठामध्ये या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. सीबीआय सध्या या प्रकरणाचा तपास करीत असल्यामुळे याचिकाकर्त्यांनी त्यांच्याकडे आपले म्हणणे मांडणे जास्त संयुक्तिक ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली. दाभोलकर हत्येचा तपास करताना पुणे पोलीसांनी मांत्रिकाला बोलावून आरोपींचा शोध घेण्यासाठी प्लॅंचेट केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांचे वकील आर. एन. काचवे यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सीबीआयकडे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा