आचारसंहितेपूर्वी मान्यतेचे सर्व प्रशासकीय सोपस्कर पूर्ण केल्यानंतर रस्त्यांवर डांबर टाकण्यासह झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवून शहरातील रस्ते चकचकीत करण्यात येत आहेत. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी विद्यमान नगरसेवकांनी निवडणुकीच्या तोंडावर शहरातील नागरिकांना जाता-जाता का होईना चांगले रस्ते दिले, अशी खोचक प्रतिक्रिया मतदारांमधून उमटत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

[jwplayer ZFs6PXoZ]

गेल्या दहा वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडचा विकास मोठय़ा प्रमाणात झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. राष्ट्रवादीकडून विकासकामांचे दावे केले जात असताना सत्तेची स्वप्न पडत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून ते दावे खोडून काढले जात आहेत. विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने भाजपकडून केला जात आहे. या आरोपाने आणि पक्षातून सुरू असलेल्या ‘आउट गोईंग’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते हैराण झाले आहेत. शहर विकासाचा दावा करताना राष्ट्रवादीकडून नेहमीच रस्ते विकासाचा मुद्दा पुढे केला जात आहे.

राज्यात रस्त्यांचा विकास पिंपरी-चिंचवड इतका कोणत्याही शहरात झाला नसल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्याच रस्त्यांवर आता निवडणुकीच्या तोंडावर डांबर टाकून रस्ते चकचकीत करण्याचे उद्योग सुरू आहेत. पिंपरी, काळेवाडी, चिंचवड, संभाजीनगर, दापोडी, पिंपळे सौदागर, विद्यानगर, प्राधिकरण आदी बहुतांश भागात रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आवारातही डांबर टाकण्यात आले आहे. याशिवाय पेव्हिंग ब्लॉक बसविणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगविणे आदी कामे झाली आहेत तर काही कामे सुरू आहेत. आचारसंहितेच्या पूर्वी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी घेऊन करारनामे केल्यानंतर घाई-घाईने कामाचे आदेश देण्याची तत्परता महापालिका प्रशासनाने दाखविल्यामुळे शहरातील रस्ते चकचकीत झाले आहेत.

[jwplayer siBod4cy]