पिंपरी – चिंचवड : चिखली परिसरात हार्डवेअरच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास चिखली परिसरातील पूर्णानगर भागात घडली आहे. चौधरी कुटुंबाचं सचिन हार्डवेअर नावाचं दुकान आहे. त्याच दुकानात हे कुटुंब वास्तव्यास होतं. चिमणराव चौधरी आणि नम्रता चिमणराव चौधरी हे पती- पत्नी मुलगा भावेश (वय १५) आणि सचिन (वय १३) यांच्यासह राहत होते. परंतु, आज पहाटे हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली आणि या आगीत एकाच कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी चौधरी कुटुंब काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. ही ट्रिप त्यांची शेवटची होईल, असे स्वप्नातही वाटले नसेल.
पिंपरी- चिंचवडमध्ये चिखली भागात सचिन हार्डवेअरच्या दुकानाला आज पहाटे भीषण आग लागली. हे हार्डवेअरचे दुकान चौधरी कुटुंबाचे होते. अवघं कुटुंब दुकानात वास्तव्यास होते. अचानक आग लागल्याने झोपेत असलेल्या कुटुंबाला बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मूळचे राजस्थान येथील असून दीड वर्षांपासून पिंपरी- चिंचवडमध्ये हार्डवेअरचा व्यवसाय करत होते. नुकतेच हे कुटुंब काश्मीर येथे फिरण्यासाठी गेले होते. ही ट्रिप त्यांची अखेरची ठरेल, असं स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल. आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : पिंपरी चिंचवडमधील दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू
दुकानात तयार केलेल्या माळ्यावर चौधरी कुटुंब राहत होत. आज पहाटे अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. तेव्हा कुटुंबातील तीन जणांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दुकानात पेंट्ससह केमिकल असल्याने आग तीव्र झाली. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं नाही. चारही जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहेत. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.