पिंपरी : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मावळ विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. मावळ येथील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात स्थिर सर्वेक्षण पथकाने कारमधून १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारचालक पियुष जखोडीया (वय ३४) यांना ताब्यात घेतले. मावळ येथील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोलनाका येथे खोपोलीकडून पुण्याकडे जात असलेल्या मोटारीची तपासणी केली. त्यावेळी मोटारीत रोकड सापडली. चालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले. मात्र, तपासात तफावत आढळल्याने रक्कम जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केली असल्याचे मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा – महापौर ते… आमदार, खासदार!

हेही वाचा – तोतया डॉक्टरविरुद्ध गुन्हा, वैद्यकीय पदवी नसताना व्यवसाय

दरम्यान, मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपने भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेच बापू भेगडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना भाजपने पाठींबा दिला आहे. त्यामुळे मावळच्या लढतीकडे पुणे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri after khed shivapur now cash of 17 lakh 75 thousand has been seized in maval pune print news ggy 03 ssb