पिंपरी : जाहिरात फलकांसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्यांचे (होर्डिंग) स्ट्रक्चरल मजबूत असल्याची खातरजमा करावी. कमकुवत असेल तर त्वरित हटविण्यात यावे. वादळ, वारा, जोरदार पावसाने स्ट्रक्चर पडून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्यास जाहिरात फलकधारकासह संबंधित संरचना अभियंत्यास जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी जाहिरात फलकधारकांनी जाहिरात फलक मंजूर करून उभारले आहेत. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीस वादळवारा मोठ्या प्रमाणावर येतो. वादळवाऱ्याने कुजलेले, गंजलेले, कमकुवत अशा प्रकारचे जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जीवित किंवा वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत. गेल्यावर्षी किवळेत लोखंडी सांगाडा अंगावर पडल्याने पाच जणांचा बळी गेला होता. या घटना टाळण्यासाठी महापालिकेने बैठक घेतली.

Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Firing on saraf shop worker in Shahapur
शहापुरातील सरफच्या दुकानातील कामगारावर गोळीबार
Hinjawadi, Pimpri Chinchwad Municipal Corporation ,
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयटीनगरी हिंजवडीसह सात गावांचा समावेश का रखडला?
Katraj Kondhwa road traffic jam, Katraj Kondhwa road,
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याबाबत मोठी घडामोड, आयुक्तांनी घेतली बैठक दिले आदेश !
Sewage channel cover Pune, Pune roads,
झाकणांमुळे होतोय जीव ‘वर-खाली’, कोणत्या भागात घडतोय हा प्रकार !
Villagers boycotted hearing on including 29 villages in Vasai Virar Municipal Corporation
सुनावणीच्या पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद ग्रामस्थांचा बहिष्कार, बोगस हरकतींचा आरोप
sandeep kshirsagar
“वाल्मिक कराडला अटक करा, अन्यथा आंदोलन”, आमदार क्षीरसागर यांचा इशारा

हेही वाचा – पुणे : नांदेड सिटीतून शाळकरी मुलगी बेपत्ता, पोलीस आयुक्त रस्त्यावर, मुलगी सुखरूप रांजणगावमध्ये सापडली

महापालिका हद्दीतील काही जाहिरात फलक हे परवानगीकरिता प्रलंबित आहेत. ही बाब उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. तसेच सर्व जाहिरात फलकांची सादर केलेली स्थापत्यविषयक स्थिरता (स्ट्रक्चर स्टॅबिलिटी) पुन्हा सन २०२४-२५ एप्रिलअखेरपर्यंत तपासून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा – पिंपरी : कॅम्पातील व्यापाऱ्यांचा महायुतीला पाठिंबा; महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंना धक्का

आकाशचिन्ह विभागाचे उपआयुक्त संदीप खोत म्हणाले की, स्थापत्यविषयक स्थिरता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. जाहिरात फलकांना ज्या संरचना अभियंत्याने प्रमाणपत्र दिले आहे. त्यापैकी एखादे जाहिरात फलक कमकुवत आढळले किंवा फलक पडून काही जीवित व वित्तहानी झाल्यास संबंधित संरचना अभियंत्यास जबाबदार धरण्यात येणार आहे.

Story img Loader