पिंपरी : चिंचवडमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक, शहर कार्याध्यक्ष माेरेश्वर भाेंडवे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शहर राष्ट्रवादीला हा धक्का असल्याचे मानले जात आहे.

माेरेश्वर भाेंडवे हे दाेन वेळा महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. २०१४ मध्ये भाेंडवे यांनी चिंचवड विधानसभेची अपक्ष निवडणूक लढविली हाेती. यावेळी त्यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. भाेंडवे यांच्यासह चार माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत चिंचवडची जागा भाजपकडून साेडवून घेण्याची मागणी केली हाेती. मात्र, पवार यांनी मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली हाेती.

हेही वाचा – वस्तूंच्या पुनर्वापरासाठी…

महाविकास आघाडीत ज्या पक्षाला चिंचवडची जागा सुटेल, त्या पक्षात प्रवेश करणार असल्याचेही या माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले हाेते. त्यानंतर माेरेश्वर भाेंडवे यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चिंचवडची जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाला सुटल्याचे बाेलले जात आहे. तर, पिंपरी आणि भाेसरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सुटल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतील इतर माजी नगरसेवकांचा चिंचवडमध्ये मेळावा घेऊन प्रवेश होणार असल्याचे भोंडवे यांनी सांगितले.

वाचा – पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्तांवर कडक कारवाई

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक आहे. महायुतीत चिंचवडची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) घेण्याची मागणी केली हाेती. परंतु, नेतृत्वाकडून काेणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून शिवसेनेत प्रवेश केल्याचे माजी नगरसेवक माेरेश्वर भाेंडवे यांनी सांगितले.