पिंपरीतून शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत यांचं आव्हान..

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे विजयी झाले आहेत. अजित पवार मंत्री पदासाठी माझा नक्की विचार करतील. पिंपरी विधानसभा मतदारसंघात मंत्रिपद मिळेल. असा विश्वास अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. अण्णा बनसोडे हे विजयी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >>> पिंपरीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक

अण्णा बनसोडे म्हणाले, अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांचे मी आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला उमेदवारी दिली. विश्वास सार्थ ठरवत मी विजयी झालो आहे. हा विजय जनतेचा आणि एकजुतीचा आहे. पुढे ते म्हणाले, पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये तुतरीच माझ्यासमोर आव्हान नव्हतं. परंतु, तस चित्र निर्माण केलं गेलं. पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अस चित्र भासवल गेलं. महाराष्ट्रात महायुतीचे एकतर्फी विजय झाला आहे. माझा देखील एकतर्फी विजय झाला आहे. मंत्री पदासाठी माझा विचार अजितदादा करतील असा विश्वास आहे. अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader