पिंपरी : दुचाकीला धक्का मारल्याचा जाब विचारल्याने तिघांनी तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तरुणाला मोटारीने धडक देऊन बोनेटवरून काही अंतर नेल्याची घटना आकुर्डी रेल्वे स्थानक ते बिजलीनगरदरम्यान घडली.
जेकेरिया जेकब मॅथ्यू (वय २३, रा. निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमलेश उर्फ अशोक पाटील (वय २३, रा. बिजलीनगर, चिंचवड), हेमंत चंद्रकांत म्हाळसकर उर्फ सोन्या चंद्रकांत माळसकर (वय २६, रा. तळेगाव दाभाडे), प्रथमेश पुष्कल दराडे (वय २२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त
u
जेकेरिया आणि त्यांचे मित्र दुचाकीवरून जात होते. कमलेश याने त्याच्या मोटारीने जेकेरिया यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे जेकेरिया यांनी कमलेश याला जाब विचारला. त्या कारणावरून कमलेश आणि त्याच्या मित्रांनी जेकेरिया यांना मारहाण केली. त्यानंतर जेकेरिया यांना मोटारीने धडक दिली. त्यात ते मोटारीच्या बोनेटवर पडले. आरोपींनी जेकेरिया यांना बोनेटवरून आकुर्डी रेल्वे स्थानक येथून संभाजी चौक-बिजलीनगरदरम्यान नेले. यामध्ये जेकेरिया जखमी झाले. त्यानंतर आरोपी पळून गेले.