खासदार व गटनेत्यांची फूस असल्याची चर्चा; भाजपमधील गटबाजीचे राजकारण पुन्हा तापले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पिंपरी शहर भाजपमधील गटबाजीच्या राजकारणाने पुन्हा उचल खाल्ली असून त्याचाच एक भाग म्हणजे, कारभारी आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या विरोधात भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला आहे. खासदार अमर साबळे तसेच पक्षनेते एकनाथ पवार यांची फूस यामागे असल्याचे पक्षवर्तुळात मानले जात असले तरी असा काही प्रकार नसल्याचे साबळे व पवारांच्या समर्थकांनी स्पष्ट केले आहे.
आमदार जगताप व लांडगे हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. त्यांचे मोठय़ा संख्येने असलेले समर्थकही त्याच पक्षातून आले आहेत. सद्यस्थितीत भाजपचा संपूर्ण ताबा पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी नेत्यांकडे असल्याची भावना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. काही दिवसांपासून पक्षात नव्या-जुन्यांचा वाद पुन्हा सुरू झाला आहे. नुकत्याच झालेल्या स्वीकृत सदस्यांची निवड करताना निष्ठावंतांना डावलण्यात आले, असा जुन्या मंडळींचा आरोप आहे, त्यावरून पक्षातील राजकारण ढवळून निघाले होते. आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत एकनाथ पवार समर्थकांनी उपोषण केले होते. तेव्हा मध्यस्थीसाठी आलेले संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी या कार्यकर्त्यांचा दानवे यांच्याशी संवाद घडवून आणला, तेव्हा आंदोलकांनी दानवे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी दानवे लोणावळ्यात आले असता, या कार्यकर्त्यांनी दानवे यांची भेट घेतली. जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, माजी आमदार दिगंबर भेगडे, नगरसेवक माउली थोरात, केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे, संदीप कस्पटे, उमा खापरे, शैला मोळकआदी उपस्थित होते.
शेखर लांडगे, अजय पाताडे, पोपट हजारे, बाळासाहेब मोळक यांनी प्रातिनिधीक स्वरूपात कार्यकर्त्यांचे गाऱ्हाणे मांडले. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. पक्षाच्या घटनेनुसार कामकाज होत नाही. सुकाणू समितीच्या बैठका होत नाहीत. निवड नियुक्तया करताना विश्वासात घेतले जात नाही. मनमानी कारभार सुरू आहे. हे नेते पुन्हा राष्ट्रवादीत जातील, असे बरेच मुद्दे मांडण्यात आले. कार्यकर्त्यांचे सारे म्हणणे दानवे यांनी ऐकून घेतले. तुम्ही सांगा मी काय करू, असा प्रतिप्रश्नही दानवे यांनी केला. येथे जे काय सुरू आहे, त्याची संपूर्ण कल्पना आपल्याला आहे. या संदर्भात, दोन्ही आमदारांशी चर्चा करू, कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही दानवे यांनी दिली, तेव्हा कार्यकर्त्यांचे समाधान झाले. आमदारांविषयीच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणारा एक वर्ग शहरात कार्यरत आहे. त्याचपद्धतीने, दानवे यांच्याकडे आमदारांविषयीच्या तक्रारी मांडण्यात आल्या, यामागे खासदार साबळे व पवार यांची फूस असल्याची शक्यता पक्षात व्यक्त केली जाते. तथापि, तसे काही नसल्याचा दावाही दोघांच्या समर्थकांकडून करण्यात येतो आहे.