लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी अखेर दोन महिन्यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. महिला शहराध्यक्षपदी माजी नगरसेविका सुजाता पालांडे, तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारीणीत दहा उपाध्यक्ष तर सहा सरचिटणीस आहेत.

शंकर जगताप यांची १९ जुलै रोजी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. दोन महिन्यांनी त्यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. कार्यकारिणीवर जगताप यांच्यासह विधानपरिषद आमदार उमा खापरे यांचे वर्चस्व दिसून येत आहे. माजी शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक कार्यकारिणीत दिसून येत नाहीत.

आणखी वाचा-प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त उद्या पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत बदल… जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

वरिष्ठ उपाध्यक्ष, पक्ष प्रवक्तेपदी राजू दुर्गे , उपाध्यक्ष माऊली थोरात, रवींद्र देशपांडे, विनोद मालू, विशाल कलाटे, सिद्धेश्वर बारणे, बिभीषण चौधरी, पोपट हजारे, बाळासाहेब भुंबे, आशा काळे यांची नियुक्ती झाली आहे. सरचिटणीसपदी संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैला मोळक, शीतल शिंदे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चिटणीसपदी मधुकर बच्चे, राजश्री जायभाय, गीता महेंद्रू, विजय शिनकर, सागर फुगे, कविता भोंगाळे, हिरेन सोनावणे देवदत्त लांडे, विशाल वाळुंजकर, महेंद्र बाविस्कर, कोषाध्यक्षपदी संतोष निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध सेलचे अध्यक्षही जाहीर केले आहेत. त्याचबरोबर ६४ जणांना कार्यकारिणी सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri bjp jumbo executive announced pune print news ggy 03 mrj