मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कल्याण-डोंबिवली निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रंगलेल्या वादाचे पडसाद अजूनही राजकीय वर्तुळात आहेत. अशातच, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ बहुचíचत विधानाचा आधार घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने जोरदार पोस्टरबाजी सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चलबिचल झाली आहे.
‘भाजपने आमची मैत्री पाहिली, मात्र वाघाचा पंजा पाहिला नाही’ असे ठसकेबाज विधान ठाकरे यांनी प्रचारादरम्यान केले होते, त्यास मुख्यमंत्र्यांनी, पंजाची भीती आम्हाला नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीला दाखवा, असे रोखठोक प्रत्युत्तर दिले होते. वाघाच्या जबडय़ात घालूनी हात मोजितो दात, जातही अमुची, पहा चाळूनी पाने अमुच्या इतिहासाची.. या पंक्तींचाही संदर्भ मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा राजकीय लाभ घेण्यासाठी शहर भाजपने कंबर कसली आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रासह वाघाच्या जबडय़ात घालुनी हात.. या ओळी मोठय़ा होर्डिगद्वारे झळकावण्यात आल्या आहेत. भाजपच्या वाढलेल्या राजकीय ताकदीचा संदर्भ त्यात देण्यात आला आहे. तथापि, यावर कोणाचाही नामोल्लेख नाही. त्यामुळे ही होर्डिग कोणाच्या सांगण्यावरून लावण्यात आली, याचा उलगडा होत नाही. भाजपच्या या होìडगमुळे शिवसेनेच्या गोटात मात्र चलबिचल झाल्याचे दिसून येते.

Story img Loader