छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह बहुजन समाजाच्या महापुरूषांच्या अवमानाच्या निषेधार्थ गुरूवारी (८ डिसेंबर) पिंपरी-चिंचवड शहर बंद ठेवण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या माध्यमातून शहर बंदचे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा- राज्यपालांविरोधात पुण्याच्या माजी महापौरांचे राजभवनापुढे धरणे आंदोलन
गुरूवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड शहर बंद करण्यात येणार असून शहरातील सर्व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पाठीशी घातले असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.