पिंपरी- चिंचवडच्या बोपखेलमध्ये साडेतीन वर्षीय गिरीजा गणेश शिंदे या चिमुकलीचा लोखंडी गेट अंगावर पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज वृंदावन सोसायटीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत चिमुकलीचे वडील गणेश शिंदे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वृंदावन सोसायटीचे मालक श्रीनिवासलू संधीरेड्डी आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – धर्मेंद्र- हेमामालिनीला न्यायालयाचा दिलासा; मावळातील जमिनीचे खरेदीखत रद्द करण्याचा दावा फेटाळला

हेही वाचा – देशातील इथेनॉल उत्पादनक्षमता १५८९ कोटी लिटरवर

दोन दिवसांपूर्वी बोपखेल येथील गणेश नगर गल्ली नंबर दोनमध्ये चिमुकलीसह चार लहान मुलं गेटजवळ खेळत होती. पैकी, दोघेजण गेटच्या आत गेली. तर गिरीजा आणि तिची मैत्रीण बाहेर होत्या. दोघी गेटपासून लांब गेल्या होत्या. परंतु, त्या पुन्हा गेटजवळ धावत आल्या. तेव्हा गेटच्या आतील मुलांनी गेट ओढले ते गेट पुढे सरकले आणि स्टॉपर नसल्याने थेट गिरीजाच्या अंगावर पडल्याने तिचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. या घटने प्रकरणी गणेश शिंदे यांनी वृंदावन सोसायटीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत आज दिघी पोलिसांनी वृंदावन सोसायटीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीच्या लोखंडी गेटला स्टॉपर नसल्याने निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप दिघी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही.

Story img Loader