पिंपरी-चिंचवडमधील वाकडच्या फिनिक्स मॉल समोर हवेत गोळीबार करणाऱ्या बाला शिंदे नावाच्या व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय उर्फ बाला लहू शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माथाडीचं काम न मिळाल्यामुळे हवेत गोळीबार केल्याचे पोलीस तपासात समोर आल आहे. अक्षय उर्फ बाला शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मुंबई : जाहिरात फलकांचीही झाडाझडती, १४ हजारांहून अधिक जाहिरात फलक हटवले

हेही वाचा – डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही, तो सगळ्याच मिरवणुकांना लागू – उच्च न्यायलयाची स्पष्टोक्ती

मंगळवारी वाकड परिसरात असणाऱ्या फिनिक्स मॉल गेट नंबर सात या ठिकाणी बाला शिंदे याने हवेत गोळी झाडून दहशत पसरवली होती. गणपती विसर्जनाच्या दिवशी घटना घडल्याने पोलिसांची देखील धावपळ झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही ताब्यात घेऊन आरोपीचा अवघ्या काही तासांत शोध लावला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि कारचालक रणजीत नथुराम सलगर याला देखील गुन्हे शाखा युनिट चारने भुमकर चौकातून अटक केली आहे. हा गोळीबार माथाडीचं काम न मिळाल्यामुळे केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हवेत गोळीबार करून आरोपी बाला शिंदेने दहशत निर्माण केली होती. तशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad accused who opened fire in front of phoenix mall arrested kjp 91 ssb