भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर महायुतीच्या सोबत असलेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील माजी आमदार विलास लांडे यांनी भाजपा पक्षश्रेष्ठीला याबाबत पत्र लिहिलं असून शरद पवारांवरील टीका थांबवण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपाकडून सातत्याने शरद पवार यांना लक्ष करत त्यांच्यावर जहरी टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेदरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत शरद पवार हे भटकती आत्मा असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतला होता. त्याचबरोबर हे वक्तव्य अजित पवार यांना देखील पटलेलं नव्हतं. याचा फटका लोकसभेत बसला असल्याचं माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटल आहे. त्यामुळे अमित शहा यांनी शरद पवारांना भ्रष्टाचाराचा सरदार म्हणणं योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या वक्तव्याचा आगामी विधानसभेवर परिणाम होऊ शकतो, असे देखील त्यांनी अधोरेखित केल आहे.

allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
Uddhav Thackeray-Sharad Pawar meeting,
उद्धव ठाकरे-शरद पवार यांची भेट, महाविकास आघाडीची लवकरच बैठक होणार
Man who killed for Rs 100 gets seven years in prison pune news
पुणे: शंभर रुपयांसाठी खून करणाऱ्याला सात वर्ष सक्तमजुरी
Ajit Pawar
“जनमानसात खराब प्रतिमा असणाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही”, अजित पवारांचा रोख कोणाकडे? राष्ट्रवादीच्या शिबिरात म्हणाले…

हेही वाचा – नागपूर : ‘जागा रिक्त नाही तर पोटनिवडणुका का?’, उच्च न्यायालयात याचिका

हेही वाचा – राज्यात नवी राजकीय आघाडी! रविकांत तुपकर यांची मोर्चेबांधणी; पुण्यात पदाधिकाऱ्यांची…

पुन्हा अशा प्रकारे शरद पवारांवर टीका करू नये म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माजी आमदार विलास लांडे यांनी पत्र दिले आहे. ते अजित पवारांचे आणि शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. शरद पवारांवर टीका केल्याने त्यांचं मन दुखावले आहे.

Story img Loader