पिंपरी- चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलीस ठाणे आणि बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, गुन्हे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, अनिल विभूते आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या दापोडी येथील पोलीस ठाण्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी सात कलमी शंभर दिवसांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे अजित पवार यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.

सात कलमी शंभर दिवसांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली. दापोडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे तसेच पोलीस आयुक्तालयाच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या आराखड्याचे अजित पवार यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. दापोडी आणि बावधन पोलीस ठाणे कमी जागेत आणि पोलीस चौकीत सुरू करण्यात आले होते.