पिंपरी-चिंचवड : पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. अरबाज सैफल शेख अस अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरबाज सैफल शेख हा हॉटेल व्यवसायिक होता. रस्ता रुंदीकरणामध्ये त्याच हॉटेल पाडण्यात आलं. सध्या तो बेरोजगार होता. काही मित्र गुंड प्रवृत्ती चे असल्याने पैकी एकाने त्याला पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस दिले होते.
याबाबत ची माहिती मालमत्ता विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी विशाल गायकवाड, गणेश हिंगे, गणेश सावंत, सुमित देवकर हर्षद कदम यांना मिळाली होती. हे सर्व जण पेट्रोलिंग करत असताना भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतलं. त्याच्याकडे एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आलं आहे. आर्म ऍक्ट नुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भोसरी पोलीस करत असून ही कारवाई मालमत्ता विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय ढमाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.