पिंपरी- चिंचवड: २०४१ पर्यंत पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या ६० लाख होण्याचा अंदाज आहे. कारण लोकसंख्या वाढवायला फार काही करावं लागतं नाही. लोकांनी मनावर घेतलं, की लोकसंख्या वाढते, असे विधान अजित पवारांनी करताच एकच हशा पिकला. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये बोलते होते. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कारा समारंभाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी करत टोलेबाजी केली.
अजित पवार म्हणाले, १९९१ ला खासदार होतो. तेव्हा, हवेली हा एकच विधानसभा मतदारसंघ होता. आता तीन मतदारसंघ आहेत. २०२९ ला पाच मतदारसंघ झाले तर आश्चर्य वाटू देऊ नका. चिंचवड आणि भोसरीमध्ये दोन – दोन, पिंपरीत एक विधानसभा मतदारसंघ होईल. या मतदारसंघात वेगवेगळ्या सहकाऱ्यांना प्रतिनिधित्व देऊ. पण, लोकसंख्या वाढत आहे. आपल्याला पाणी कमी पडायला लागलं आहे. भामा असखेड, आंध्र प्रकल्पामधून पाणी घेत आहोत. तरीही पाणी कमी पडत आहे. २०४१ पर्यंत पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या ६० लाख होण्याचा अंदाज आहे. कारण लोकसंख्या वाढायला फार काही करावं लागतं नाही. लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते, असे विधान अजित पवारांनी केलं आहे. अजित पवारांनी असे म्हणताच एकच हशा पिकला.