पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आणि कृष्णा डायग्नोस्टीक यांच्या सहकार्याने अत्याधुनिक प्रयोगशाळेची सुविधा असलेल्या ‘कोविड-19 टेस्ट बस’ सेवेचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते बुधवारी प्रारंभ करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील कंटेन्मेट झोनमधील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिक, दुर्धर आजाराने त्रस्त तसेच जेष्ठ नागरिकांची मोफत करोना टेस्ट या अत्याधुनिक प्रयोग शाळेत करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधितांचा आकडा वाढत चालला असून अधिक जलद टेस्ट करण्यात याव्यात म्हणून अत्याधुनिक प्रयोगशाळाची सुविधा असलेल्या विशेष बसची निर्मिती करण्यात आली. यात कोविड-19 पूर्व चाचणी, मोबाईल एक्सरे, रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- Coronavirus: करोनामुळं पुण्यात पोलिसाचा दुसरा बळी

अशा प्रकारची सुविधा देणारी  ही पिंपरी चिंचवड शहरातील पहिली बस सेवा  आहे. या माध्यमातून वस्ती पातळीवर जाऊन काम केले जाणार असून या माध्यमातून कोविड-19 पूर्व चाचणी, मोबाईल एक्सरे, रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे या मार्फत जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने कंटेन्मेंट झोनमधील हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील नागरिक व दुर्धर आजाराने त्रस्त व जेष्ठ नागरिकांची कोवीड पूर्व चाचणी या प्रयोगशाळेत विनामूल्य करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad covid 19 test bus is now in service for checking citizens msr 87 kjp