पिंपरी : बँकांमध्ये बनावट खाती उघडून त्याची माहिती चीन, नेपाळ येथील सायबर फसवणूक करणाऱ्यांना देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अविनाश ज्ञानोबा बाकलीकर ऊर्फ कॉम किंग (वय २६, रा. निलंगा जि. लातूर), आदाब रुपम शेख ऊर्फ मॅडी (वय २६, रा. नरेशविहार, खोडा कॉलनी, गाझियाबाद), सतीश भगवान मोरे (वय ३५, रा. पोरवाल रोड, लोहगांव, मूळ-तांबडवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवी येथील एका व्यक्तीला ट्रेडिंगद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६१ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
Gulabi
‘या’ मराठी चित्रपटाने रचला इतिहास, प्रदर्शनापूर्वीच कमावले कोट्यवधी…
Supriya Sule Sudhanshu Trivedi
Bitcoin Scam : महाराष्ट्रात बिटकॉइन स्कॅम? व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीनशॉट्स दाखवत भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Sameer Bhujbal vs Suhas Kande (1)
“आज तुझा मर्डर फिक्स”, सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी; म्हणाले, “त्यांचे गुंड आले मला…”
Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Exit Poll Live: महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार नाही? एग्झिट पोलचे कल महायुतीच्या बाजूने! मतदारांचं नेमकं काय ठरलंय?
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक

हे ही वाचा… पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्यापैकी एक खाते हे वाघोली येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी चौकशी केली असता संबंधित बँक खाते बाकलीकर व मोरे यांच्या सांगण्यावरून काढल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून तीन आरोपींना लोणावळा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे १२ मोबाइल संच, एक लॅपटॉप, नऊ बँक पासबुक, एटीएम, डेबिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड असा तीन लाख ५५०० रुपयांचा मुद्देमाल सापडला.

हे ही वाचा… रपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा पसार, कोंढवा भागातील घटना

बाकलीकर हा छत्रपती संभाजीनगर परिसरात वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत बँक खाते काढत होता. या खात्याची माहिती नेपाळ, चीनमधील सायबर गुन्हेगारांना देत होता. त्यांच्याशी संगनमत करून ते सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीसारखे काम करीत असल्याचे समोर आले. कंपनीने दिलेले टोपणनाव वापरून सायबर विश्वात व इतर आरोपींना आपली ओळख लपवून संपर्क करीत होते. आंतरराष्ट्रीय सायबर आरोपी हे सायबर गुन्ह्यांची बैठक काठमांडू, नेपाळ येथे घेत असल्याचेही तपासात समोर आले. बाकलीकर याने एका खात्याच्या बदल्यात दोन ते तीन लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, सायबर गुन्हेगार यांच्याकडून पैसे स्वीकारण्यासाठी बायनान्सच्या माध्यमातून यूएसडीटी या क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे घेत असल्याचेही निष्पन्न झाले. बाकलीकर याच्या मोबाइलद्वारे ५५ खात्याची माहिती सापडली.