पिंपरी- चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान महेश लांडगे यांनी केल्यानंतर अजित पवारांनी तोच धागा धरून महेश लांडगे यांना माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं, हे मला माहित नाही. परंतु, ज्यानं चांगलं काम केलं आहे, त्याला चांगलं म्हणायला शिका, असं म्हणत अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला आहे.

मी अनेकदा पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात आलेलो आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी अनेकदा चर्चा केली आहे. त्यामुळे जे चांगलं काम करतात त्याला चांगलं म्हणायला शिका असं म्हणत आमदार महेश लांडगे यांना अजित पवार यांनी शाब्दिक टोले लगावले आहेत. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडलं. त्यानंतर झालेल्या भाषणा दरम्यान महेश लांडगे यांनी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रयत्न केले, असं म्हणत त्यांचं अजित पवारांसमोर कौतुक केलं आणि हाच धागा धरून अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना चांगलं सुनावलं.

Story img Loader