पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगर सेवक केशव घोळवे यांना ५५ हजारांची खंडणी घेतल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. यात आणखी चार जणांची नाव देखील पुढे आली आहेत.

तसेच, २०१९ पासून भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेत दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडून व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.  गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनशाम यादव, मलका यादव, केशव घोळवे आणि हसरत अली शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलिसात तक्रार दिली आहे. 

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
oath ceremony of Mahavikas Aghadi MLAs in the assembly session print politics news
महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधी
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तर माझ्या बरोबर कुणीही काम केलं नसतं”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळी मार्केट येथील जागा मेट्रो प्रकल्पात जात असल्याने तेथील व्यापाऱ्यांना १०० गाळे शासनामार्फत मिळणार आहेत. तरी देखील आरोपी यांनी संगमत करून २०१९ पासून ते आज पर्यंत तक्रारदार आणि इतर व्यापाऱ्यांना महानगर पालिकेकडून गाळे मिळवून देतो, असे सांगून भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेत दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडले अशी फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने तक्रारदाराकडून ५५ हजारांची खंडणी घेतली. तरी देखील आरोपींनी एक लाखांची मागणी केली होती. त्यास विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली अस देखील तक्रारीत नमूद आहे. 

Story img Loader