पिंपरी- चिंचवड मध्ये भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांचा एक प्रताप समोर आला आहे. या संदर्भात राजू दुर्गे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. शहरातील काळभोर नगर मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर अनेकांनी दुचाकी पार्क केल्या होत्या. राजू दुर्गे यांनी त्या दुचाकी आडव्या पाडल्या असून मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे. की राजू दुर्गे यांनी असं का? केलं. यावर त्यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.
काळभोर नगर प्रभाग क्रमांक १४ या ठिकाणी नामांकित कंपनीचं सर्विस सेंटर आणि शोरूम आहे. यामुळे त्या रस्त्यावर अनेक दुचाकी आणि चार चाकी पार्क केल्या जातात. काळभोर नगर मध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना याचा अडथळा निर्माण होतो. यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा नागरिकांचे वाद देखील झाले आहेत. असं राजू दुर्गे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. आज मात्र माझा राग अनावर झाला. प्रचंड मानसिक त्रास झाल्यामुळे शोरूम समोर पार्क केलेल्या दुचाक्या आडवा केल्या अस राजू दुर्गे यांनी म्हटलं आहे. दुर्गे यांनी संबंधित शोरूम आणि सर्विस सेंटर च्या अधिकाऱ्यांना आणि सुरक्षारक्षकांना बाहेर गाडी उभा करू नये यासाठी विनंती केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.