पिंपरी-चिंचवडमध्ये ‘शिव स्वराज्य’ यात्रा काही वेळातच दाखल होणार असून भोसरीमध्ये शरद पवार गटाच्या ‘शिव स्वराज्य’ यात्रेचा भव्य मेळावा होणार आहे. भोसरीमध्ये भव्य असा वॉटरप्रूफ मंडप घालण्यात आला आहे. परंतु, या दरम्यान एक चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी आमदार विलास लांडे हे या मंडपात दिसले. त्यांनी या सभेच्या मंडपस्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. यामुळं एकच चर्चा रंगली आहे. विलास लांडे हे नेमके अजित पवार गटात आहेत? की शरद पवार गटात असाही प्रश्न निर्माण होत आहे.
हेही वाचा – “दहा वर्षांत लाडकी बहीण आठवली नाही”, पृथ्वीराज चव्हाण यांचा अजित पवारांना टोला
हेही वाचा – VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अॅण्ड रन प्रकरण! घटना सीसीटीव्हीत कैद
राज्यभर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रा काढत असून ते सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत आहेत. प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आजपासून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेची सुरुवात जुन्नरमधून करण्यात आली आहे. शिवस्वराज्य यात्रेचा आज भोसरीमध्ये भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या तयारीचा आढावा चक्क अजित पवार गटाचे नेते माजी आमदार विलास लांडे यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार गटाचा शिवस्वराज्य यात्रेचा मेळावा असताना अजित पवार गटाच्या नेत्याने ‘या’ तयारीचा आढावा घेतल्याने पिंपरी- चिंचवड शहरात एकच चर्चा रंगली आहे. विलास लांडे हे आता उघडपणे शरद पवार गटाला पाठिंबा देत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.