पिंपरी : शहरवासीयांची तहान भागविणारे पवना धरण शंभर टक्के भरल्याने वर्षभराची जलचिंता मिटली असली तरी, पाणीपुरवठा दिवसाआडच कायम राहणार आहे. आंद्रा, भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत दररोज पाणीपुरवठा केला जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांना सन २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. पवना नदीवरील रावेत येथील बंधाऱ्यातून महापालिका पाणी उचलते. निगडी, प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. तेथून शहरात वितरित केले जाते. सध्या शहराला पवना ५१०, आंद्रा धरणातून ८०, एमआयडीसीकडून २० असे ६१० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी पुरवठा केला जात आहे. समन्यायी पाणीपुरवठ्याचे कारण देत शहराला पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.

Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
air quality deteriorated in pune city due to diwali firecracker
शहरभर फटाक्यांची तुफान आतषबाजी… हवेची गुणवत्ता खालावली…
Pune redevelopment old buildings, Pune old buildings, Stalled redevelopment old buildings pune,
पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !
This year almost all tours during Diwali holidays have house full registration
दिवाळीच्या सुट्टीत सर्वच टूर्स कंपन्यांसाठी ‘हाऊसफुल’ नोंदणी

हेही वाचा >>> शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी

पावसाने ओढ दिल्याने जूनमध्ये धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. जून महिना कोरडा गेल्याने पाणी कपातीचे संकट ओढवले होते. जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीपातळी सातत्याने वाढत गेली. आठवडाभर पाऊस झाला. धरणात जुलैअखेर ५० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतरही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तीन वेळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मागील दोन दिवस धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले. शहरवायीयांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

पाणलोट क्षेत्रात २७७७ मिली मीटर पावसाची नोंद

पवना धरण दर वर्षी १५ ऑगस्टपूर्वी शंभर टक्के भरत असते. यंदा धरणातून तीन वेळा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे धरण शंभर टक्के भरण्यास २६ ऑगस्ट उजाडले. जून महिन्यापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २७७७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी २६ ऑगस्टअखेर २८८२ मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. धरण शंभर टक्के भरल्याने वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. पण, वाढत्या लोकसंख्येला उपलब्ध पाणी पुरेसे नाही. त्यामुळे पाणीपुरवठा दिवसाआडच कायम ठेवण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.