प्रेमप्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या शेजारी राहणाऱ्या महिलेला आणि प्रेयसीला प्रियकराच्या कुटुंबाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. घडलेल्या या प्रकरणानंतर प्रेयसी मात्र गावी निघून गेली आहे. हे सर्व प्रकरण पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलं आहे. घटनेप्रकरणी प्रियकराची पत्नी, आकाश तावडे यांच्यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
हेही वाचा – नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आणि शेजारणीला मारहाण करणाऱ्या महिलेच्या पतीचे प्रेमप्रकरण सुरू होते. मुलगी देखील शेजारीच राहत होती. तक्रारदार महिला दोघांमध्ये मध्यस्थी करत असल्याचा संशय होता. शुक्रवारी संबंधित मुलीला पाहून आरोपी महिलेच्या कुटुंबाचा राग अनावर झाला. ही मुलगी कशाला तुझ्याकडे आली आहे. तिच्यामुळे माझ्या मुलीचा संसार तुटत आहे. फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी आणि कंबरेच्या बेल्टने मारहाण केली. प्रेयसीला देखील मारहाण करण्यात आली असे तक्रारीत म्हटलं आहे. परत ती मुलगी इथं दिसली तर जिवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण झाल्यानंतर प्रेयसी गावी निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.