पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून केल्याची घटना मध्यरात्री वाकड परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नऊ वर्षीय मुलीसमोरच ही घटना घडली. रमेश पुजारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. तर ललिता पुजारी अस खून झालेल्या महिलेचं नाव आहे. आईचा खून झाला तर वडील कारागृहात गेल्याने तीन मुलं पोरकी झाली आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश हा मद्यपान करायचा आणि पत्नी ललिताला मुलांसमोरच मारहाण करायचा. पुजारी दाम्पत्याला तीन मुलं आहेत पैकी पाच वर्षीय मुलगा, नऊ वर्षीय मुलगी त्यांच्या सोबत राहात होती. तर, तिसरी मुलगी हॉस्टेलला राहते.

दरम्यान, रात्री उशिरा पती- पत्नीमध्ये वाद झाला. रमेशचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याचा राग अनावर झाला आणि क्षणाचा ही विचार न करता त्याने ललिताच्या डोक्यात फरशी घातली. गंभीर जखमी झालेली ललिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता.

घटनेत ललिताचा मृत्यू झाला असून आरोपी रमेश पुजारीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. आईचा मृत्यू झाला तर वडील कारागृहात असल्याने मुलं आई वडिलाविना पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. 