पिंपरी- चिंचवड: जिल्ह्यात आज मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान झाले. विविध मतदान केंद्रावर परदेशातून खास मतदान करण्यासाठी आलेले मतदारदेखील पहावयास मिळत होते. डॉ. किरण तुळसे यांनी लंडनवरून येवून आपला मतदानाचा हक्क बजावून स्थानिक नागरिकांसमोर मतदानाचा हक्क बजावण्याचे एक आदर्श उदाहरण दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी- चिंचवड मधील डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूलमध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत.

हेही वाचा : मोसमी वारे अंदमानात कधी दाखल होणार? हवामान विभागाने दिली आनंदवार्ता…

आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे, हा विचार त्यांना मनात सतत येत होता. प्रत्येकाच्या एकेका मताने लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो आहे, असे डॉ. तुळसे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad indian youth working in london came to india for vote for lok sabha election 2024 kjp 91 css