पिंपरी- चिंचवड: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिनेश ठोंबरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. जयश्री मोरे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. नराधम दिनेशने लिव्ह इन मध्ये असताना झालेल्या तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि जयश्री गेल्या पाच वर्षांपासून वाकड मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्यांना तीन वर्षाचा मुलगा देखील आहे. दिनेशच लग्न झालेलं असून त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. जयश्रीचा सात वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. जयश्री पतीसोबत राहत नव्हती. जयश्री आणि दिनेशचं काही दिवसांपासून पटत नव्हतं. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत होती. वेगळं राहायचं म्हणत होती.

हेही वाचा : पिंपरी : प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीसह योगा प्रशिक्षकाविरोधात गुन्हा

२४ नोव्हेंबर रोजी भुमकर चौकात गाडीत दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर दिनेशने गाडीत हातोडीने जयश्रीच्या डोक्यात घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा काही वेळातच जीव गेला. दिनेशला काही समजायच्या आत तिचा मृत्यू झाला होता. दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट साताऱ्यातील खंबाटी घाट शोधला आणि त्या ठिकाणी जयश्रीचा मृतदेह फेकून दिला. दिनेश पुन्हा पिंपरी- चिंचवडमध्ये आला आणि २५ नोव्हेंबर रोजी जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये दर वर्षी तीन हजार झाडांवर कुऱ्हाड?

दरम्यान, जयश्रीचं वर्णन असलेल्या तरुणीचा मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर यामागे दिनेश असल्याचं निष्पन्न झालं. नराधम दिनेशनं तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिलं. पोलिसांनी याबाबतची पोस्ट देखील व्हायरल केली होती. अखेर या घटने प्रकरणी दिनेशला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

Story img Loader