पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी आणि आकुर्डी परिसरतील तब्बल ६० हजार ग्राहकांची वीज गेली होती. यामागचं कारण समोर आलंय. भोसरी MIDC येथील सब स्टेशनच्या ट्रान्सफार्मरवर मांजर चढले होते, तेव्हा शॉर्ट सर्किट होऊन ६० हजार ग्राहकांची वीज गेली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या अजब घटनेमुळे शहरातील आकुर्डी आणि भोसरी येथील नागरिकांना उकड्यामुळे घामाघूम व्हावं लागलं आहे तर भोसरी येथील औद्योगिक क्षेत्राला याचा फटका बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी MIDC येथे २२० केव्ही चे सब स्टेशन आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास याठिकाणी मांजर चढली आणि शॉर्टसर्किट झालं. त्यामुळे १०० एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला आणि लोड निर्माण झाला, अशी माहिती महापारेषण अधिकारी ज्योती चिपटी यांनी दिली आहे. पुढे त्या म्हणाल्या की, “औद्योगिक असोशियन सोबत चर्चा करून चक्राकार लोडशेडिंग सुरू केली आहे. ग्राहकांनी सहकार्य करावं, वीज जपून वापरावी उन्हाळा असल्याने विजेची मागणी वाढली आहे. या घटनेमुळे एक ट्रान्सफॉर्मरवर लोड आहे, जपून वीज वापरा” असं आवाहन त्यांनी केलं.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

पिंपरी चिंचवड: महापारेषण उपकेंद्रात बिघाड; भोसरी, आकुर्डीमधील ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद

दरम्यान, महापारेषणकडून बिघाड झालेल्या १०० एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची सध्या तपासणी सुरु आहे. त्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यास आल्यास तो बदलण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापारेषणच्या २२० केव्ही उपकेंद्रात सध्या सुरु असेलल्या एकमेव ७५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून त्यावरील १६ वीजवाहिन्यांसह सध्या बंद असलेल्या १० वीजवाहिन्यांना देखील पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा द्यावा लागणार आहे. या कालावधीत भोसरी विभागातील वीजपुरवठ्याची स्थिती अधिकच विस्कळीत होण्याची शक्यता आहे. एकाच पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने भोसरी विभागात चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करून सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करावा लागणार आहे. मात्र अशी स्थिती १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यासच उद्भवू शकते अशी माहिती महापारेषणकडूनन देण्यात आली.

Story img Loader