पिंपरी : निळ्या पूर रेषेतील बाधित जुन्या अधिकृत बांधकामांना वाढीव हस्तांतरित विकास हक्क (टीडीआर) देऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला जावा, अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत केली. आमदार जगताप यांनी चिंचवड मतदारसंघातील निळ्या पूर रेषेतील जुन्या अधिकृत बांधकामांबाबत औचित्याचा मुद्दा विधान सभेत उपस्थित केला. जगताप म्हणाले, चिंचवड, रावेत वाकड, ताथवडे, पुनावळे, सांगवी, पिंपळेगुरव या पवनानदीच्या पात्रालगत व त्याच बरोबर इंद्रायणी आणि मुळा नदीच्या दाट वस्तीत असलेल्या जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्या इमारतींमधील पार्किंग व्यवस्था अपुरी पडत आहे.

या परिस्थितीमध्ये त्या जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र एकात्मिक विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली नुसार प्रस्ताव सादर करण्यात आले होते. तथापि, ३० जानेवारी २०२३ च्या सुधारित युडीसीपीआरच्या ११.२.८ अन्वये पाटबंधारे विभागाने निळ्या पूर रेषेतील क्षेत्रात हस्तांतरित विकास हक्क (टीडीआर) वापरण्यास परवानगी नाकारली आहे. परिणामी, पूर रेषेतील अधिकृत बांधकामांना अतिरिक्त टीडीआर वापरण्याची परवानगी न मिळाल्याने त्या इमारतींच्या पुनर्विकासाला अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
flat of valmik karad in wakad area to be sealed by pcmc
वाल्मीक कराडची वाकडमधील सदनिका सील करणार; पिंपरी महापालिकेचा निर्णय; दीड लाख रुपयांची थकबाकी
Pedestrian subway unsafe Demand to appoint security guards Pune news
पिंपरी-चिंचवड: पादचारी भुयारी मार्ग असुरक्षित; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी
aaditya Thackeray
राज्य सरकारकडची थकीत रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करा, आमदार आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
CIDCO houses expensive navi mumbai, president Sanjay Shirsat
घरांचे दर ठरविताना अध्यक्षांना विश्वासात घेतले नव्हते का? सिडकोच्या सोडत प्रक्रियेतील संतप्त अर्जदारांचा सवाल
Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त

हेही वाचा…भटक्या श्वानांच्या हल्ल्यानंतर महापालिकेने उचलले हे पाऊल!

या निर्णयामुळे रहिवाशांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे आणि त्यासोबतच पुनर्विकास प्रक्रियाही ठप्प झाली आहे. जवळपास सहा लाख ५१ हजार चौरस मीटर क्षेत्राचे पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत, त्यामुळे महापालिकेला होणाऱ्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे.तसेच, त्यांनी महापालिकेच्या डेव्हलपमेंट चार्जेसच्या माध्यमातून मिळणारा सुमारे १२०० कोटी रुपयांचा महसूल देखील बुडत आहे. त्यासाठी निळ्या पूर रेषेतील बाधित जुन्या अधिकृत बांधकामांना वाढीव टीडीआर देऊन पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला जावा, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल त्याचबरोबर महापालिकेला आवश्यक महसूल प्राप्त होईल, असे जगताप यांनी म्हटले आहे.

Story img Loader