पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा लोकसत्ताकार्यालयात वार्तालाप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मी लोकशाही मानणारा आहे. लोकसहभागातून चळवळ उभी राहिली पाहिजे आणि त्यासाठी लोकांशी सातत्याने संवाद व्हायला हवा. मी सर्वाची मते जाणून घेऊन त्यानुसार अंमलबजावणीचे धोरण ठरवतो, हेच माझ्या कामाचे सूत्र आहे, असे पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित वार्तालापात सांगितले. लोकांच्या नेमक्या गरजा काय आहेत, लोकांना काय हवे आहे याचा विचार करून ते त्यांना देण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणे, हाच मुद्दा आता ‘स्मार्ट सिटी’साठी उपयुक्त ठरणारा आहे, असे सांगतानाच पिंपरी-चिंचवडने स्वत:ची ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षाही आयुक्तांनी या वेळी व्यक्त केली.

श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी हर्डीकर यांचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या वार्तालापात हर्डीकर यांनी पिंपरी महापालिका आयुक्तपदापर्यंतचा प्रवास सांगतानाच विविध विषयांवरील परखड मते नोंदवली.

हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये खूप बदल झाला आहे. विशेषत: गेल्या दहा वर्षांत शहराचा कायापालट झाला आहे. निवासासाठी पुणे आणि कामासाठी पिंपरी-चिंचवड अशी पूर्वीची स्थिती होती, ते चित्र आता पालटले आहे. अलीकडेच, ‘सारथी’च्या पाहणीसाठी शहरात आलो असताना, पिंपळे सौदागरचे प्रशस्त रस्ते पाहिले, तेव्हा धक्काच बसला. उसाची शेती जाऊन तेथे टोलेजंग इमारती कधी उभ्या राहिल्या, हे लक्षातच आले नाही. वेगाने विकसित होणाऱ्या त्याच पिंपरी-चिंचवडला आयुक्त म्हणून आलो आहे. येथे बरीच आव्हाने आहेत. शहरातील रस्ते मोठे आहेत, पण अंतर्गत रस्त्यांची तितकीच गरज आहे. िहजवडीच्या ‘आयटी हब’मुळे परिसराची वेगाने प्रगती झाली, तेव्हा आपली पुरेशी तयारी नव्हती, हे दिसून आले. त्यामुळे पुढील गरज आणि वाढ लक्षात घेऊन आगामी दहा ते वीस वर्षांचे नियोजन असायला हवे. त्यासाठी नेमकी वाढ कुठे व कशी होत आहे, याची माहिती असायला हवी.

पिंपरीतील एचए कंपनीची मोक्याची ५९ एकर जागा शहर विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी आहे. पाणीपुरवठा, कचरा, दिवाबत्ती,आरोग्य, शिक्षण हे महत्त्वाचे विषय आहेत. शहर विकासासाठी अनेक महत्त्वाच्या योजना आहेत. ते करत असतानाच पिंपरी-चिंचवडला स्वत:ची ओळख निर्माण करावी लागेल. प्रगत शहर आणि ग्रामीण भाग अशी पिंपरी-चिंचवडची दोन प्रकारची ओळख आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी बांधकाम परवानगीचे नियम सुटसुटीत होणे गरजेचे आहे. सध्याची पद्धत क्लिष्ट वाटते. त्यामुळेच दलाल मंडळींचा शिरकाव होतो व गैरप्रकारांची मालिका सुरू होते, असेही आयुक्त म्हणाले.

पॅरिस, लंडन, बार्सिलोना, सोल आदी शहरांच्या लोकप्रतिनिधींशी जेव्हा बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा जाणवले, की शहराचा विकास या विषयावर बोलताना ते चांगले जगण्याच्या संधी, वैयक्तिक प्रगती, गतिशीलता, आरोग्यमय जीवन, कलेला वाव या विषयांवर बोलतात, असाही अनुभव आयुक्त हर्डीकर यांनी सांगितला.

आयुक्त म्हणाले..

  • लोकप्रतिनिधींना ‘बायपास’ करत नाही, स्वत:चे निर्णय इतरांवर लादत नाही
  • अतिक्रमणे वा पथारीवाले हटाव हा कामाचा भाग; पण मुळात ही परिस्थिती का उद्भवते याचा विचार करणे सर्वात महत्त्वाचे
  • भरपूर पैसे आहेत म्हणून कसेही खर्च करणे चुकीचे
  • विकास आराखडय़ात आरक्षणे टाकून ती उठवण्यासाठी छळवणूक करणे गैर
  • चांगले काम असल्यास लोकप्रतिनिधींचे हमखास सहकार्य मिळते
  • फ्लॅट संस्कृतीमुळे संवाद हरवला
  • संवादाची माध्यमे निर्माण होतील, अशी ठिकाणी तयार झाली पाहिजेत
  • विंदा करंदीकर, पु. स. पाळंदे यांचा माझ्यावर प्रभाव
  • वाचनाची आवड आहे, सर्व प्रकारचे साहित्य वाचतो

डोंबिवली ते पिंपरी-चिंचवड

मी मूळचा डोंबिवलीचा, तेथेच बालपण गेले. दहावीत गुणवत्ता यादीत झळकलो. त्याच कालावधीत कल्याण-डोबिवलीचे आयुक्त म्हणून टी. चंद्रशेखर नियुक्त झाले होते. त्यांनी रस्ते मोठे केले आणि त्या बरोबरीने अनेक चांगली कामे केली. त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने मी प्रभावित झालो आणि सरकारी यंत्रणेत जायचे, असे तेव्हाच ठरवले. पुढे अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी पुण्यात आलो. पुरुषोत्तम, फिरोदिया यांसह अनेक गोष्टीत रमलो. र्सवकष विचार करण्याची सवय येथेच विकसित झाली. विप्रो कंपनीत काही काळ नोकरी केली. वर्षभरानंतर प्रशासकीय परीक्षा देण्याच्या मूळ निर्धाराकडे वळलो. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झालो. कोल्हापुरात उमेदवारीचा काळ गेला. तेथे दोन महिन्यांत १३ हजार शौचालय उभारणीचा अनुभव अविस्मरणीय होता. तेथून पुढे दापोली-रत्नागिरी, नंदूरबार, नांदेड, यवतमाळ येथे व नंतर तीन वर्षे ग्रामीण भागात काम केले. त्यानंतर अडीच वर्षे नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले. राज्याच्या सहा महसूल विभागांत काम केल्यानंतर आता पुण्यात पिंपरी-चिंचवडला आलो आहे.  श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी पालिका