पिंपरी : महापालिकेचा कारभार आता कागदविरहित (पेपरलेस) होणार असून, प्रशासनाने त्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘जीएसआय सक्षम ईआरपी’ प्रणालीचे अनावरण आयुक्त शेखर सिंह यांनी केले. या कार्यप्रणालीनुसार पालिकेच्या विविध ३५ विभागांचे कामकाज ऑनलाइन चालणार आहे. सर्व विभाग ऑनलाइन जोडण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्रम वाचून कामकाजात पारदर्शकता येणार आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील विवाहनोंदणी प्रमाणपत्र, सर्व नाट्यगृहांचे बुकिंग, ग्रंथालये, पशुवैद्यकीय विभागाकडील श्वान परवाने, माहिती अधिकार अर्ज (आरटीआय) आदी विभागांचे कागदविरहित ऑनलाइन कामकाज करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ विभागांचे कामकाज ऑनलाइन केले आहे. यापुढे उर्वरित विभागांचे कामकाजदेखील ऑनलाइन करण्यात येणार आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
kerala ias officer Row
Keral IAS officer: हिंदू-मुस्लीम व्हॉट्सॲप ग्रुप बनवणं महागात पडलं; केरळमध्ये दोन आयएएस अधिकारी निलंबित
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

हेही वाचा…आमदाराचे पत्र आणा, ससूनचे अधीक्षक बना! राष्ट्रवादीच्या आमदाराच्या शिफारशीनुसार मंत्र्यांकडून नियुक्ती

‘जीएसआय सक्षम ईआरपी’ प्रणालीद्वारे नागरी सुविधा, सुरक्षा, ग्रंथालय, क्षेत्रीय कार्यालये, वैद्यकीय विभाग, भांडार विभाग यासह अन्य विभागांचे कामकाज ऑनलाइन होत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना विभागातील सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. कामकाज संपूर्णपणे कागदविरहित होणार असल्याने अधिक सुलभता येणार आहे. सर्व कार्यालये ऑनलाइन झाल्यास कामकाजाच्या नस्ती, कागदपत्रे ऑनलाइन पाहता येतील. त्यामुळे कागदविरहित सर्व नस्तीला देखील मान्यता देता येणार आहे.

शहरातील नागरिकांना आता घरी बसून ऑनलाइन विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढता येणार आहे. कागदपत्रे ‘अपलोड’ केल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाकडून वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे. संदेश, ई-मेलद्वारे राखीव तारीख व वेळेची सूचना, छायाचित्र आणि बोटांचे ठसे घेण्याची सुविधा दिली जाणार आहे. कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन केली जाईल. विवाहनोंदणी प्रमाणपत्र, प्रमाणपत्रातील दुरुस्ती, विवाह संस्थांची नोंदणी करता येणार आहे. पाळीव प्राण्यांसाठी लसीकरणाची नोंद, श्वान-मांजराचा परवाना, परवाना नूतनीकरण, मृत पाळीव प्राण्यांच्या दहनासाठी परवानगी, पाळीव प्राणी दत्तक घेण्याची प्रक्रिया सहज करण्यात येणार आहे.

हेही वाचा…‘आयसिस’च्या दहशतवाद्यांचा पुणे, मुंबईसह गुजरातमधील प्रमुख शहरांत बाँम्बस्फोटाचा कट उघड

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, की महापालिकेच्या सर्व विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करणे, नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ होण्याच्या दृष्टीने ‘जीआयएस सक्षम ईआरपी’ प्रणाली सुरू केली आहे. पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही प्रणाली कार्यरत करण्यात येत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्णय घेणे सोपे होणार आहे. कामकाजाला गती मिळणार आहे.