पिंपरी : शहरात गेल्या ११ महिन्यांत बीआरटी मार्गामध्ये घुसखोरी करणाऱ्या ३९ हजार ५०७ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या वाहनचालकांकडून तीन कोटी ७१ लाख ७८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात जलद सार्वजनिक वाहतुकीसाठी बीआरटी मार्गाची आखणी करण्यात आली. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी खासगी वाहनचालकांकडून मागील काही काळापासून बीआरटी मार्गात सर्रास घुसखोरी सुरू आहे.

बीआरटी मार्ग रिकामा असल्याने आणि वाहनचालक भरधाव असल्याने अनेक अपघात घडले आहेत. त्यातच मागील दोन वर्षांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) बीआरटी मार्गातील वॉर्डन हटविले आहेत. त्यामुळे वाहनचालक बीआरटी मार्गात प्रवेश करत आहेत. आगामी काळातही बीआरटीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिला आहे.

Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
Woman killed five injured in horrific accident on Samruddhi Highway Nagpur news
समृद्धी महामार्ग: दुभाजकाला धडकून कारचे दोन तुकडे; महिला ठार, पाच जखमी
Missing tempo driver, Narayangaon accident,
पुणे : नारायणगाव अपघात प्रकरणातील पसार टेम्पोचालक गजाआड, एसटी बसचालकही अटकेत
Vasai Virar City, Vasai Virar City Rickshaw,
वसई विरार शहरात रिक्षा झाल्या उदंड, बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी; प्रवासी नागरिक त्रस्त
pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?

हेही वाचा : खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र का दिले? नेमकं पत्रात काय म्हटलं?

बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांकडून ‘नो एण्ट्री’साठी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय वाहन परवाना नसणे, मोबाइलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे, आवश्यक कागदपत्रे न बाळगणे आणि जुनी दंडवसुलीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader